चंदगड / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने दरवर्षी शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवाच आयोजन करत असते. या वर्षी ४३ व्या युवा महोत्सवाचं आयोजन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड या ठिकाणी करण्यात आलं होतं. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी पथनाट्य स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. ज्वलंत विषय व मुलांचे उत्तम सादरीकरण याआधारे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला व या संघाची मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली. यासाठी त्यांना संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रदिप बोभाटे त्यांचे सर्व सहकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment