केंचेवाडी येथील हरिपाठ स्पर्धेत बागिलगेचे बाल हरिपाठ मंडळ प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2023

केंचेवाडी येथील हरिपाठ स्पर्धेत बागिलगेचे बाल हरिपाठ मंडळ प्रथम

 

केंचेवाडी (ता. चंदगड) येथे आम. राजेश पाटील याचा सत्कार करताना सेवा संस्थेचे संचालक मनोहरपंत कुट्रे, बाजुला गोपाळराव पाटील, सरपंच बागडी, अभय देसाई, ह. भ. प. संजय पाटील आदी.

चंदगड / प्रतिनिधी 

         केंचेवाडी (ता. चंदगड) येथील ओंकार अष्टविनायक गणेश मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या खुल्या हरिपाठ स्पर्धेत बागिलगे येथील रवळनाथ बाल हरिपाठ मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक माऊली महिला मंडळाने मिळविला.स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून सानिका पाटील (बागिलगे) हिची निवड करण्यात आली. 

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

        ३ )सिध्दीविनायक हरिपाठ मंडळ शिरगांव, ४)भावेश्वरी माता हरिपाठ मंडळ बसर्गे,५)जोतिर्लिग महिला हरिपाठ मंडळ निट्टूर,६)लक्ष्मी माता महिला हरिपाठ मंडळ दुंडगे,७) भावेश्वरी महिला हरिपाठ मंडळ निट्टूर,८)संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ मंडळ शिप्पूर या मंडळानी अनुक्रमे नंबर मिळविले.तर उत्कृष्ठ पखवाज वादक मयुरी सुतार (दुंडगे)उत्कृष्ट नृत्य सुप्रिया होनगेकर (माणगाव)शिस्तबद्ध संघ - कल्मेश्वर महिला हरिपाठ मंडळ कालकुंद्री यांची निवड करण्यात आली.

          स्पर्धेचे उदघाटन चंदगड आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते जेष्ठ नेते गोपाळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती झाले. तर हरिपाठ स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजप नेते शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, संग्रामसिह कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

      यावेळी मार्गदर्शक कीर्तन,प्रवचनकार हरिपाठ स्पर्धेचे आयोजक ह भ प संजय पाटील, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, सरपंच सौ.कृतिका बागडी, माजी सरपंच गावडू पाटील, चेअरमन सुभाना पाटील, तंटामुक्त अध्यक्ष एम टी पाटील, माजी अध्यक्ष विजय जाधव, माजी सरपंच कृष्णा पाटील माजी उपसरपंच दत्ता आवडण, निवृत्ती जाधव, संजय पाटील, मोहन जाधव, सागर पाटील, नामदेव पाटील, दत्तू पाटील, नंदकुमार पाटील,जानबा घोळसे,पुंडलिक पाटील,यांच्यासह गावातील वारकरी पुरुष महिला तरुण मंडळ पंचक्रोशीतील हरिपाठ मंडळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment