चंदगड येथे एलआयसी टीम सुखकर्ता कार्यालयाचा उद्या शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2023

चंदगड येथे एलआयसी टीम सुखकर्ता कार्यालयाचा उद्या शुभारंभ

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

 विमा प्रतिनिधी भरती, प्रशिक्षण केंद्र व हप्ता भरणा केंद्र या एलआयसी टीम सुखकर्ता कार्यालयाचा शुभारंभ गुरुवार दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता चंदगड येथे होणार असल्याची माहीती कार्यालयाचे सर्वेसर्वा चेअरमन क्लब मेंटर एम. डी. आर. टी. गजानन बाबुराव राऊत यांनी दिली. 

    गडहिंग्लजचे एसबीएम विनायक गायतोंडे यांच्या हस्ते कार्यालयाचा शुभारंभ होईल. यावेळी चंदडगचे बीम किरण औचिते, आजरा बीम सदानंद गायकवाड, चंदगड एओ चंद्रशेखर बीचगत्ती व शेखर कुरलकर्णी प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. तसेच चंदगड, आजरा, गडहिंग्लजचे एलआयसीचे पदाधिकारी, कर्मचारी व विमा प्रतिनिधीही उपस्थित असतील.  एलआयसी ऑफिस शेजारी, डॉ. सुनिल परीट यांच्या इमारतीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. अधिक माहीतीसाठी 9420930835 व 7083120835 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन टीम सुखकर्ता व सर्व वीमा प्रतिनिधी यांच्या वतीने करण्यात आले आहे. 



No comments:

Post a Comment