बिजूर येथील पवन चौकुळकरचे स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2023

बिजूर येथील पवन चौकुळकरचे स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश

यशानंतर अभिनंदन करताना आई-वडील.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       बिजूर (ता. चंदगड) येथील पवन एकनाथ चौकुळकर याने महाराष्ट्र शासनाच्या "लसंपदा विभाग (पाटबंधारे विभाग)" स्पर्धापरीक्षेमध्ये ११३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन "कनिष्ठ अभियंता वर्ग-2 स्थापत्य" या पदावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण)उपविभाग चंदगड येथे नियुक्ती मिळाली.

       सध्या महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग (MIDC) उपविभागीय कार्यालय रत्नागिरी येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असून यापूर्वीही त्याने -१) भारत सरकार टंकसाळ मुंबईच्या "स्थापत्य पर्यवेक्षक" स्पर्धा परीक्षेत देशात 18 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

२) महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या (MIDC) स्पर्धा परीक्षेत 99.80% गुण मिळून महाराष्ट्रात 24व्या क्रमांकाचे उत्तीर्ण होऊन कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदावर कार्यरत आहे.

३) महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग (म्हाडा)च्या स्पर्धा परीक्षेत राज्यात 61 व्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाला आहे.

    त्याच्या या यशाच्या चढत्या आलेखामुळे बिजूर,चंदगड, शिक्षक कॉलनी व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडळी,नातेवाईक आणि सर्व समाजातून कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment