'किटवाड' वक्तृत्व स्पर्धेत ८३ स्पर्धकांचा सहभाग, अनुष्का धुरी व चार्वी कुंभार प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2023

'किटवाड' वक्तृत्व स्पर्धेत ८३ स्पर्धकांचा सहभाग, अनुष्का धुरी व चार्वी कुंभार प्रथम

 


कुदनूर : सी एल वृत्तसेवा (जोतिबा पाटील)

          ज्ञान, सेवा, त्याग युवक मंडळ किटवाड (ता. चंदगड) आयोजित वकृत्व स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी दोन्ही गटात मिळून ८३ स्पर्धकांनी भाग घेतला. दोन्ही गटातील विजेते पुढीलप्रमाणे लहान गट - इयत्ता ५ वी ते ७ वी प्रथम क्रमांक- कु. अनुष्का परशराम धुरी (संजय गांधी विद्यालय नागणवाडी) द्वितीय - कु. ऋतुजा राजेंद्र पाटील (मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी), कु. पूर्वा प्रवीण बोकडे (श्रीराम विद्यालय कोवाड), उत्तेजनार्थ- कु.संजोग गजानन सुतार (सिद्धेश्वर हायस्कूल कुदनूर).

         मोठा गट - इयत्ता ८ वी ते १० वी प्रथम क्रमांक- कु. चार्वी रवींद्र कुंभार (जागृती हायस्कूल गडहिंग्लज), द्वितीय क्रमांक- कु सारिका बाळू बोंद्रे (व्ही के चव्हाण हायस्कूल कागणी), तृतीय क्रमांक- कु हर्षदा संदीप पाटील (हनुमान विद्यालय मांडेदुर्ग), उत्तेजनार्थ- कु. आर्या संजय साबळे (म. फुले विद्यालय कार्वे) यांनी रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे पटकावली. यावेळी प्रा संजय साबळे, मुंबई पोलीस सुबराव लाड आदींनी मनोगते व्यक्त केली. स्वागत मंडळाचे सचिव महेश पाटील, नागनाथ नांदवडेकर आदींनी केले. स्पर्धेसाठी परीक्षक व पंच म्हणून प्रा महेश वसंत पाटील, यल्लाप्पा मोदगेकर, एस जे सुतार, व्ही एन सुतार, महेश शिवाजी पाटील, रामचंद्र मोरे, महेश हेब्बाळकर, सिद्धेश मोदगेकर, अजित नांदवडेकर, राजाराम बाबू पाटील, जोतिबा पाटील, तातोबा धामणेकर, सुबराव दत्तू कांबळे, नारायण पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजाराम बाबू पाटील यांनी केले. जोतिबा पाटील यांनी आभार मानले. यावेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव तालुक्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment