कुदनूरला मराठा आरक्षणासाठी कँन्डल मार्च, हजाराे युवक रस्त्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2023

कुदनूरला मराठा आरक्षणासाठी कँन्डल मार्च, हजाराे युवक रस्त्यावर

  


चंदगड / प्रतिनिधी
     कुदनूर (ता. चंदगड) येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी साठी मनाेज जरांगे पाटील याना पाठींबा देण्यासाठी मराठा एकवटला. हजारो युवकांनी कँन्डल  पेटवून पाठींबा व्यक्त केला. शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. मनाेज जरांगे पाटील तुम आगे बढाे हम तुम्हारे साथ है, अशा घाेषणा देण्यात आल्या. 
    यावेळी  तुकाराम ओऊऴकर, लक्ष्मण शहापुरकर, ग्रामपंचायत सदस्य  सिद्राम गुंडकल यांनी मनोगत व्यक्त केली. आभार सचिन तांदऴे यांनी मानले.

No comments:

Post a Comment