रवी पाटील यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथील विद्यार्थांना शैक्षणिक वस्तू वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2023

रवी पाटील यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथील विद्यार्थांना शैक्षणिक वस्तू वाटप


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      सध्या कुणाचाही वाढदिवस म्हटला की केक, पुष्पगुच्छ, हॉटेल, पार्टी, मित्र या सगळ्या गोष्टी आल्याच. पण या सर्व गोष्टींना फाटा देऊन राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथील अध्यापक रवी पाटील यांनी आपला 50 वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. अध्यक्षस्थानी शिनोळी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच गणपत कांबळे होते.

"शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात ही योगदान देऊन शाळेच्या व गावच्या कार्यात सहभागातून उल्लेखनिय कार्य करणारा हरहुन्नरी व बहुआयामी व्यक्तिमत्त्व अवलिया म्हणजे रवी पाटील असे प्रसंशोद्गार उपसरपंच पुंडलिक गवसेकर यांनी काढले.

     यावेळी त्यांनी 100 विद्यार्थ्यांना पेन, पेन्सील, पट्टी, खोडरबर व शॉपनर व चॉकलेट अशा पाच शैक्षणिक वस्तू प्रत्येक विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिली. रवि पाटील हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात.  

रवी पाटील यांनी आपल्या वाढदिवशी शैक्षणिक साहित्य वाटून अगळा वेगळ्या पद्धतीने जन्मदिन विद्यार्थ्या समवेत साजरा केला. यामुळे सरांचे कौतुक होत आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष महादेव शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश मारूती गावडे, सदस्य यशवंत डागेकर व कुद्रेमानी प्राथमिक विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जोतिबा बडसकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी मुख्याध्यापक एन. टी. भाटे, शिक्षकवर्ग एस. बी. कदम, सदाशिव पाटील, विक्रम तुडयेकर व शिक्षकेत्तर कर्मचारी तानाजी पाटील, पिराजी सुतार, ज्ञानेश्वर सुतार, यल्लुप्पा भाटे , अरुण सुर्यवंशी व विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment