आसगाव येथील पाटिलवाडी येथे महावितरण कंपनीचे फ्युज वितरण पेटी बदलावी - ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2023

आसगाव येथील पाटिलवाडी येथे महावितरण कंपनीचे फ्युज वितरण पेटी बदलावी - ग्रामस्थांची मागणी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       आसगाव (ता. चंदगड) येथील पाटिलवाडी येथे महावितरण कंपनीचे फ्युज वितरण पेटी अत्यंत खराब झाली आहे. गावडेवाडी व पाटीलवाडी येथील शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी, पोल्ट्री व पिकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण  झाली आहे. सदरची डीपी पाटीलवाडी मेन रोडवर असल्याने या ठिकाणाहून जास्त रहदारी असते. पेटीला दरवाजा नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर पेटी बदलून द्यावी अशी मागणी गावडेवाडी व पाटीलवाडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment