संकल्प विकसित भारत रथाचे सातवणे येथे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2023

संकल्प विकसित भारत रथाचे सातवणे येथे उद्घाटन

 

आपला संकल्प विकसित भारत रथाचे उद्घाटन करताना सौ रेखा नांगरे, शंकर भेकणे,शांताराम पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     आपला संकल्प विकसित भारत योजनेअंतर्गत चित्र रथाचे उद्घाटन सातवणे (ता. चंदगड) येथे मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास कोल्हापूर जिल्हा संयोजक सौ. रेखाताई नांगरे पाटील, चंदगड तालुका संयोजक शंकर भेकणे, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष शांताराम बापू पाटील, पंचायत समिती माजी सभापती बबनरावजी देसाई, विस्तार अधिकारी श्री. ठोंबरे, मोहन परब, सुनिल काणेकर, सरपंच विठ्ठल कांबळे, स्नेहल सोनुर्ले, आरती कागणकर, ग्रामसेवक सुरेश देसाई, अमेय सबनीस आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती श्री ठोंबरे यांनी सविस्तर दिली. हेल्थ कार्ड गोल्डन कार्ड, आबा कार्ड, विश्वकर्मा योजना अशा विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी सातवणे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment