गणपतराव जयसिंगराव देसाई |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) व सध्या कोल्हापूर, मोरेवाडी रेव्हून्यू कॉलनी येथील केडीसीसी बँकेचे निवृत्त विभागीय अधिकारी (डी. ओ.) गणपतराव जयसिंगराव देसाई (वय 72) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी दि. 15) रोजी पहाटे एक वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे.
मूळचे खानापूर व सध्या कोल्हापूर येथील उद्योजक दत्तात्रय लक्ष्मण देसाई तसेच बुझवडे (ता. चंदगड) येथील विक्रम विजय दळवी यांचे ते सासरे होय. तसेच किणी (ता. चंदगड) येथील हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सी. जे. देसाई, गडहिंग्लज येथील शिवराज कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य दिवंगत डॉ. बी. जे. देसाई, पनवेल येथील व्यंकटेश देसाई, प्रकाश देसाई (कोल्हापूर) यांचे ते मोठे बंधू होत. सोमवारी रक्षा विसर्जन होणार आहे.
No comments:
Post a Comment