वसंत रामचंद्र जाधव |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
किटवाड येथे शुक्रवारी दि. 15 रोजी सकाळी वसंत रामचंद्र जाधव (वय 40, मुळगाव किटवाड व सध्या रा. काकती) यांचे पोल्ट्रीमध्ये झोपेतच निधन झाले.
वसंत हे शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत झोपले होते त्यामुळे ग्रामस्थांना याबाबत संशय आला. त्यांनी यानंतर कोवाड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. शुक्रवारी दुपारी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निवृत्त सैनिक रामचंद्र जाधव यांचे यांचे ते चिरंजीव तर निवृत्त मुख्याध्यापक नारायण जाधव (कार्वे) यांचे ते पुतण्या होय. तसेच रामपूर (ता. चंदगड) येथील नलवडे शुगर्सचे इन्स्ट्रुमेंट तंत्रज्ञ अरुण गावडे यांचे ते मामेभाऊ होत
वसंत यांनी पाच वर्षापासून आपल्या मूळ गावी किटवाड येथे पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, बहीण असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि. 18 रोजी सकाळी होणार आहे.
No comments:
Post a Comment