मराठा आरक्षण प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची होणार १८ डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक, माजी खासदार संभाजीराजे यांचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2023

मराठा आरक्षण प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची होणार १८ डिसेंबर रोजी दिल्लीत बैठक, माजी खासदार संभाजीराजे यांचा पुढाकार


चंदगड / प्रतिनिधी
     मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सोमवार दि.१८ डिसेबर रोजी दिल्ली येथे महाराष्ट्र भवनात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक आयोजित केली आहे.
     महाराष्ट्रात ऐरणीवर असलेला मराठा आरक्षण या विषयी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकमताने संसदेत आवाज उठवावा, याकरिता छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथे राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे. १८ डिसेंबर रोजी दिल्ली येथील महाराष्ट्र भवन येथे होणाऱ्या या बैठकीस संभाजीराजे यांच्याकडून राज्यातील सर्व लोकसभा व राज्यसभा खासदारांना निमंत्रित करण्यात आले असून या बैठकीला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, खासदार शरद पवार, मंत्री भागवत कराड, मंत्री डाॅ भारती पवार,मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री रामदास आठवले, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व खासदारांना निमंत्रण दिले आहे.

No comments:

Post a Comment