आमरोळीच्या उपसरपंचपदी सौ अनुराधा गुरव बिनविरोध - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2023

आमरोळीच्या उपसरपंचपदी सौ अनुराधा गुरव बिनविरोध

  

सौ. अनुराधा मारूती गुरव

चंदगड / प्रतिनिधी 
   आमरोळी-पोरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. अनुराधा मारूती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी निवडणुक अधिकारी तथा मंडलाधिकारी शरद मगदूम होते.
      प्रारंभी लोकनियुक्त सरपंच प्रकाश उर्फ बाळु वाईगडे यानी सर्वाचे स्वागत केले. यावेळी  रामचंद्र पाटील, नीता पाटील, प्रिया पाटील, शिवराम नाईक, भारती नाईक, अनुराधा गुरव, संजय गावडे, दयानंद यादव, मनिषा कदम या सदस्यांसह पोलीस पाटील मारूती नाईक, धोंडीबा नाईक, डाॅ. विजयकुमार कांबळे, जयवंत मंडलिक, मंगेश खामकर, संजय सुतार, वैजु खामकर, सुरेश वाईंगडे, ग्रामसेवक युवराज मगदूम, पिन्टू गुरव उपस्थित होते. आभार ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी मानले.

No comments:

Post a Comment