इको केन कारखान्याची ३० नोव्हेंबर पर्यंत ३१०० प्रमाणे ऊस बिल जमा - संचालक सतीश अनगोळकर यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2023

इको केन कारखान्याची ३० नोव्हेंबर पर्यंत ३१०० प्रमाणे ऊस बिल जमा - संचालक सतीश अनगोळकर यांची माहीती



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         म्हाळुंगे कारखान्याने नोव्हेंबर ३० अखेर गळीतास आलेल्या उसाचे बिल जमा केले असून यापुढील उस बिले मागील बिला प्रमाणे जलद दिली जाणार आहेत. अशी माहिती कारखान्याच्या वतीने कारखान्याचे संचालक सतीश अनगोळकर यांनी दिली. या गाळप हगामात कारखान्याने काल दिनांक १३/१२/२०२३ अखेर गाळपाचे  ३३ दिवस पूर्ण केले असून दिनांक ३० नोव्हेबर् पर्यंत गळीतास आलेल्या उसाला प्रती मे टनाला ₹ ३१००/-  दराप्रमाणे ऊस बिल कारखान्याने अदा केले आहे. यापुढे प्रत्येक पंधरा दिवसाला ऊस बिल आदा करण्याचा कारखान्याचा मानस आहे.

        चंदगड तालुक्यातील उसाला प्रथम प्राधान्य देणार आहे.  ऊस उत्पादक शेतकरी यांना विनंती आहे की यावर्षीचा हंगाम सुरू होतानाकाही तांत्रिक बाबीमुळे विलंब झाल्याने तोडणी वाहतूक यंत्रणा ही कर्नाटक भागात गेलेली होती. सदरची यंत्रणा हळूहळू चंदगड भागात येत असून मोठ्या प्रमाणात यंत्रनाही चंदगड भागात आता सध्या कार्यान्वित होत आहे.  वेळेत ऊस बिल जमा होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे फार मोठ योगदान लाभले.  कारखान्याने आतापर्यंत गाळपास आलेल्या एकूण 50 हजार 125 मेटना उसाचे बिल हे  ऊस उत्पादक शेतकरी यांच्या थेट खात्यावर जमा केले आहे. अशी माहिती मॅनेजर बाबासाहेब देसाई यांनी दिली.

No comments:

Post a Comment