जि. प. च्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चंदगड तालुक्याला उपविजेतेपद...! जि. प. शाळांतील मुलांचा कलाविष्कार फेस्टिवललाही भारी..! सीईओ संतोष पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2024

जि. प. च्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चंदगड तालुक्याला उपविजेतेपद...! जि. प. शाळांतील मुलांचा कलाविष्कार फेस्टिवललाही भारी..! सीईओ संतोष पाटील

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नृत्य अविष्कार सादर करताना देवरवाडी, ता. चंदगड शाळेतील मुली.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       प्राथमिक शाळांचा कलाविष्कार युवा फेस्टिवललाही मागे टाकेल असे गौरवद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी काढले. जिल्हा परिषद कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धा सन २०२३/२४ च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. वाड्यावस्त्यांवरील, खेड्यापाड्यातील मुलांमध्ये असलेली कला शोधणे आणि त्यांना मोठ्या व्यासपीठावर संधी उपलब्ध करून देणे हा या सांस्कृतिक स्पर्धांमागील उद्देश आहे. कोल्हापूर जिल्हा गुणवत्तेत अव्वल आहेच पण कलागुणातही तो कोठेही मागे नाही हे या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येते असे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.

        दरवर्षी केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर होणाऱ्या या सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी एका फेस्टिवल किंवा  महोत्सवापेक्षाही मोठ्या आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत कागल तालुक्याने विजेतेपद चंदगडने उपविजेतेपद तर राधानगरी तालुक्याने तिसरा क्रमांक पटकावला.

    उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करीत सर्वांना निकोप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटनपर प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी स्पर्धेचा उद्देश कथन केला आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कशाप्रकारे उत्तम कार्य करीत आहेत याचा आढावा घेतला.

    उ पशिक्षणाधिकारी  एस. के. यादव, उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी एम्. आय. सुतार, रवींद्र ठोकळ, आर. व्ही. कांबळे, विविध स्पर्धांसाठी नियुक्त परिक्षक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी शाहू स्मारक कोल्हापूर येथे या समारंभासाठी उपस्थित होते.

      स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे बक्षीस वितरण शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या हस्ते तर दुसऱ्या दिवसाचे बक्षीस वितरण शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी  अजय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याते व प्रसिद्ध निवेदक संदीप मगदूम आणि सविता कुंभार यांनी केले.

   यावेळी स्पर्धा परिक्षक रवींद्र सुर्वे, शाहू बनकर, दिलीप चव्हाण, विजय गारे, दीपक जगदाळे, परशुराम आंबी, संयोगिता महाजन, आझाद नायकवडी, सरीता सुतार,  शिवराज पाटील, सीताराम जाधव, भाग्यश्री चरणकर, ओंकार सुतार, स्नेहल कुंभार, महेश हिरेमठ  यांनी कामकाज पाहिले.


स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे.


       *स्पर्धा निकाल लहान गट*


*कथाकथन*

*प्रथम क्रमांक* -प्रचिती भोसले, भोसलेवाडी, शाहुवाडी

*द्वितीय क्रमांक* -राजवीर साठे, चंद्रे, राधानगरी

*तृतीय क्रमांक* -आराध्या सुतार, बोरवडे, कागल


*प्रश्नमंजुषा*

*प्रथम क्रमांक* -शिरोली, चंदगड

*द्वितीय क्रमांक* -म्हाकवे, कागल

*तृतीय क्रमांक* -सोनाळी, भूदरगड


*समूहगीत*

*प्रथम क्रमांक* -क.नरतवडे, राधानगरी

*द्वितीय क्रमांक* -लिंगनूर दु. कागल

*तृतीय क्रमांक* -वेतवडे, गगनबावडा


*नाट्यीकरण*

*प्रथम क्रमांक* - फेजीवडे, राधानगरी

*द्वितीय क्रमांक* -जैतापूर, शिरोळ

*तृतीय क्रमांक* - क. पट्टणकोडोली, हातकणंगले


*समूहनृत्य*

*प्रथम क्रमांक* - तडशिनहाळ, चंदगड

*द्वितीय क्रमांक* - पुष्पनगर, भूदरगड

*तृतीय क्रमांक* - लिंगनूर दु. कागल


*स्पर्धा निकाल मोठा गट*


*कथाकथन*

*प्रथम क्रमांक* - रिया पाटील, घुंगुर, शाहुवाडी

*द्वितीय क्रमांक* - वेदिका भोसले, बेलवळे खुर्द, कागल

*तृतीय क्रमांक* विभावरी बनकर, गणेशवाडी माळ, ता. शिरोळ


*प्रश्नमंजुषा*

*प्रथम क्रमांक* - सोनाळी, भूदरगड

*द्वितीय क्रमांक* -अणूर, कागल

*तृतीय क्रमांक* - धुंदवडे, गगनबावडा


*समूहगीत*

*प्रथम क्रमांक* - कोनोली तर्फ असंडोली, राधानगरी

*द्वितीय क्रमांक* - लिंगणूर  दु., कागल

*तृतीय क्रमांक* - तडशिनहाळ, चंदगड


*नाट्यीकरण*

*प्रथम क्रमांक* - उर्दू सहारानगर, रुई, हातकणंगले

*द्वितीय क्रमांक* - सूंडी, चंदगड

*तृतीय क्रमांक* - येवती, करवीर


*समूहनृत्य*

*प्रथम क्रमांक* - देवरवाडी,चंदगड

*द्वितीय क्रमांक* - हिटणी, गडहिंग्लज

*तृतीय क्रमांक* - लिंगणूर  दु., कागल


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक समन्वय समिती,सर्व शिक्षक संघटना, संस्था, जि. प. अधिकारी, कर्मचारी, शाहू स्मारकचे व्यवस्थापक व कर्मचारी, ध्वनी दिग्दर्शक, छायाचित्रकार, वार्ताहर  इ. सर्वांचे सहकार्य लाभले.

      बक्षीस वितरण समारंभात माध्यमिक  शिक्षणासाठी एकनाथ आंबोकर यांनी स्पर्धक, शिक्षक,पालक, संगीतकार, कर्मचारी आणि  अधिकारी या सर्वांचे कौतुक केले आणि उत्तमरीतीने स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्राथमिक शिक्षण विभागास धन्यवाद दिले. ते पुढे म्हणाले की सहभागी सर्व तालुके विजेते आहेत. सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे. यापुढे स्पर्धेत थीम डान्स हा प्रकार घेता आला तर अधिक रंगत येईल.

     दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांत मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख विस्तार अधिकारी एम्. आय. सुतार यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment