चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील अंगणवाडी पर्यवेक्षीका श्रीमती स्वाती नामदेव गोंदके (वय वर्ष ३७, मुळ गाव धुमाळवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर, सध्या रा.देसाईवाडी चंदगड) यांचे काल रविवार दि. १४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक लहान मुलगी, आई,वडील असा परिवार आहे.श्रीमती स्वाती यांच्या पार्थिवावर काल मुळ गावी धुमाळवाडी येथे अत्यंसंस्कार करण्यात आले.शोकसभा चंदगड पंचायत समितीमध्ये बुधवार दि.१७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे.
No comments:
Post a Comment