सुंडी शाळेत १५ व्या वित्त आयोगातून बांधलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन व कृतज्ञता सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2024

सुंडी शाळेत १५ व्या वित्त आयोगातून बांधलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन व कृतज्ञता सोहळा

सुंडी येथे १५ व्या वित्त आयोगातून शाळा प्रवेशद्वाराचे उद्घाटन करताना मनीषा शिवनगेकर व मान्यवर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 
     सुंडी (ता. चंदगड) येथील मराठी विद्या मंदिर येथे १५ व्या उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी उपसभापती मनीषा शिवनगेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सरपंच मनोहर कांबळे अध्यक्षस्थानी होते.
  प्रास्ताविक मुख्याध्यापक वैजनाथ पाटील यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुबराव पाटील यांनी स्वागत केले.
    क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या प्रगतीसाठी वेळोवेळी योगदान दिलेल्या मान्यवरां बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.  सरपंच मनोहर कांबळे यांची सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल, अश्विनी चंद्रकांत गिरी यांची शिवगंगा महिला दूध संस्था चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तर धुळाप्पा सरशेट्टी यांची जय किसान पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 
     गावातील माजी सैनिक संघटनेच्या वतीने शाळेतील मुलांना रोज सकाळी शारीरिक व्यायामाचे धडे दिले जातात, याबद्दल संघटना अध्यक्ष ऑ. कॅप्टन तुकाराम कांबळे व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. माझी अभ्यासिका उपक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या माध्यमातून रोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत अभ्यासिका चालवली जाते, अशी माहिती मुख्याध्यापक यांनी सांगितली. यावेळी जय जवान पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन एन एम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेला  रोख देणग्या दिल्या. कार्यक्रमास सेवानिवृत्त शिक्षक झि निं पाटील, अनिल शिवणगेकर, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष तानाजी टक्केकर, माजी अध्यक्ष तानाजी पाटील, पुंडलिक मोरे, उपसरपंच शुभांगी पाटील, सदस्य संजीवनी पाटील, माधुरी पाटील, यादू पाटील, वाकोबा पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अध्यापक संतोष देवळी यांनी केले. रोहिदास पाटील यांनी आभार मानले. उदय कांबळे, बेबी कदम या शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment