कुदनूर येथे श्री हुडगामा देवीला दुग्धाभिषेक घालताना भाविक. |
कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथे 'श्री हुडगामा देवी' अभिषेक सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. गावातील पशुधनावर रोगांची साथ आल्यास या देवीला दुग्धाभिषेक घातल्याने रोगाची साथ निघून जाते. अशी गावकऱ्यांमध्ये अनेक वर्षांपासून श्रद्धा आहे.
गावातील जनावर बाजार, स्टँड परिसरात असलेल्या पाषाण रूपातील देवीचा परिसर व्यापारी संघटना व ग्रामस्थांच्या पुढाकाराने शुभेच्छा करण्यात आला आहे. भाविकांच्या देणगीतून बसण्यासाठी सिमेंट बाक बसवले आहेत. स्टॅन्ड परिसरातील व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने येथे दरवर्षी भजन व दुग्धाभिषेक कार्यक्रम केला जातो.
नुकतेच गावच्या सरपंच सौ. संगीता घाटगे व सुरेश घाटगे यांच्या हस्ते बाजार समितीचे अध्यक्ष गजानन सुतार, उपाध्यक्ष मुबारक जमादार, रवळू परीट, जोतिबा सुतार, दयानंद मुतकेकर, सिद्राम कुंडकल, अमित जाधव, सिद्धेश्वर सुतार, विठ्ठल लोहार अनंत शहापूरकर, सिद्धापा जाधव, अमर नागरदळेकर, संजय ओऊळकर आदींच्या उपस्थितीत पूजन करून गावातील पशुधनाला निरोगी ठेव..! असे साकडे देवीला घालण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी करत देवीचा जयघोष केला. दिवसभर भजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
भाविकांच्या देणगीतून परिसर जीर्णोद्धार व बसण्यासाठी बाक बसवले आहेत.
No comments:
Post a Comment