कार्यशाळेत मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी ए.ए. माने व्यासपीठावर मान्यवर |
चंदगड / सी एल वृत्तसेवा
"शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती करून घेतली पाहिजे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना हे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. अलीकडे पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक शेती केली जाते. ही शेती करण्यासाठी व प्रगतशील शेतकरी बनण्यासाठी योजनांचा लाभ घेतला तर निश्चितच शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावेल यातशंका नाही ."
असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी ए. ए. माने यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील शेतकरी कार्यशाळा व पालक मेळावा या संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्ही घटकात सुसंवाद असेल तरच शिक्षण प्रक्रिया अधिक गतिमान व अर्थपूर्ण होईल असे मत व्यक्त केले. पालक अरुण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. के. एन. निकम, एम. एस. दिवटे यांनी मनोगते व्यक्त केली. समन्वयक डॉ. आर. एन. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. एन. पाटील यांनी आभार मानले. यावेळी श्री. गुरव, पाटील, गावडे यांच्यासह पालक व विद्यार्थी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment