शिवाजी रवळू बिर्जे |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी रवळू बिर्जे (वय 96) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दिनांक 13 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते रवळू बिर्जे यांचे ते वडील होय. रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक 15 रोजी सकाळी होणार आहे.
No comments:
Post a Comment