कृष्णा पोमजी सुळेभावकर |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
कागणी (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व गावातील भावेश्वरी सहकारी दूध संस्थेचे सेक्रेटरी कृष्णा पोमजी सुळेभावकर (वय 62) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. 13) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
कागणी, कल्याणपूर, हुंदळेवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या मंगल सुळेभावकर यांचे ते पती तर कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील भारतीय सैन्य दलाचे जवान मारुती पाटील यांचे ते सासरे होत. शिनोळी औद्योगिक वसाहतीमधील सतबा सुळेभावकर यांचे ते बंधू तर कोवाड (ता. चंदगड) येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत सुळेभावकर यांचे ते काका होत. महिपाळगड (ता. चंदगड) चे रहिवासी व सिंधुदुर्ग येथील डी. के. फाउंडेशनचे संस्थापक व कणकवली येथील गुरुकुल अकॅडमीचे संचालक दत्तात्रय केसरकर व बेळगाव येथील परशुराम केसरकर (एम. आर) यांचे ते मामा होत.
चंदगड व बेळगाव तालुक्यातील अनेक गावातील वारकरी सांप्रदायिक चळवळीतील ते एक अग्रेसर व्यक्तिमत्व होते.
No comments:
Post a Comment