सुरेश रामू पाटील |
भगवान आनंद सदावर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
वळणाचा अंदाज न आल्याने दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर धुमडेवाडी फाट्यानजीक शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. सुरेश रामू पाटील (वय ५०, रा. निट्टूर) व भगवान आनंद सदावर (वय ३८, सदावरवाडी) अशी मृत दुचाकी चालकांची नावे आहेत.
शनिवारी रात्री सुरेश अथर्व-दौलत कारखान्यावर उसाचे भरलेले ट्रॅक्टर अड्ड्यात लावून घरी जात होता तर भगवानही आपल्या दुचाकीवरून पाटणे फाट्यावरून सदावरवाडी गावाकडे जात असतानाच बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणाचा त्यांना अंदाज आला नाही. त्यात दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघेही रस्त्यावर आपटले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानेच ते जागीच ठार झाले. धडक इतकी भयानक होती की दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पाटणे फाटा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक शेखर बारामती, पोलिस कर्मचारी अमोल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तत्पूर्वीच दोघेही मृत झाले होते. चौकट प्रशासन कधी जागं होणार धोकादायक वळणावर यापूर्वी अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण त्यानंतरही हे वळण काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे आणखीन किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार आहे. फोटो कोल्डस्कवर धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणावरील अपघातात दुचाकींचा चुराडा झाला आहे.
No comments:
Post a Comment