सुनील सुभाष काणेकर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पश्चिम विभाग सरचिटणीस पदी चंदगड येथील उद्योजक सुनील सुभाष काणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या संघटन कौशल्याने पश्चिम महाराष्ट्रातील भाजप कामगार मोर्चाचे संघटन वाढवावे. तसेच विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून द्यावा. यासाठी त्यांना नियुक्तीपत्र व शुभेच्छा देण्यात आल्या.
शनिवार दि १३/०१/२०२४ रोजी शिवछत्रपती मंगल कार्यालय धनकवडी, पुणे येथे भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य व वस्त्र उद्योग मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, भीमराव तापकीर आमदार खडकवासला आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सुनील काणेकर यांनी यापूर्वी उद्योग आघाडी जिल्हा कार्यकारणीत केलेल्या उत्कृष्ट कार्याची पोहोच म्हणून त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये कामगारांचे प्रश्न व अडी अडचणी सोडवण्यासाठी आपण जोमाने कार्य करू, असे निवडीनंतर काणेकर यांनी सांगितले.
याच कार्यक्रमात चंदगड तालुक्यातील कुदनूर गावचे सुपुत्र दिग्विजय जोतिबा खवणेवाडकर यांची भाजप कामगार मोर्चा चंदगड विधानसभा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंदगड तालुक्यात गावोगावी भाजप पक्ष वाढीसाठी तसेच शक्ती केंद्रप्रमुख म्हणून केलेल्या कार्याची दखल या निवडीच्या निमित्ताने घेण्यात आली आहे.
यावेळी कामगार मोर्चा प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, हनुमंत लांडगे, भाईजी उर्फ जगन्नाथ गावडे, नागेश पाशकंटी, शाम पुसदकर, महेंद्र पासलकर, सुधाकर राजे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment