कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण मिळवायचेच या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील मुंबई येथे उपोषणास बसणार आहेत. मुंबई येथे जाण्यासाठी त्यांची पदयात्रा २० जानेवारी २०२४ रोजी अंतरवाली सराटी जिल्हा जालना इथून सुरू होणार आहे. या पदयात्रेत तसेच उपोषण ठिकाणी सामील होण्यासाठी कोवाड येथील उपोषण कर्ते पांडुरंग जाधव यांनी चंदगड, आजरा, गडहिंग्लज मधील तमाम मराठा बांधवांना विनम्र आवाहन केले आहे.
मराठ्यांना आरक्षण हा आपला हक्क आहे. अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड असेल तर मराठ्यांना ही शेवटची संधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज जसे गनिमी काव्याने व उपलब्ध परिस्थितीचा उपयोग करून लढले. कांदाभाकर खाऊन स्वतः चा घोडा घेऊन कशाचीही अपेक्षा न ठेवता मावळ्यांनी त्यांना साथ दिली. म्हणूनच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्यालाही मावळ्यांसारखी भूमिका पार पाडावी लागणार आहे.
मी पांडूरंग जाधव उपोषण कर्ता "सकल मराठा चंदगड" मुंबईला जात आहे, आपणही या. महाराष्ट्रात चंदगडचा आवाज घुमण्यासाठी आपण स्वखर्चाने कोणाच्याही गाड्यांची वाट न पाहता सामिल व्हा. मनोज जरांगे पाटील यांना आपण पाठिंबा देऊ या. आता नाही तर कधीच नाही. मराठ्यांची एकजूट दाखवून मुलांचे भविष्य घडवण्यासाठी चलो मुंबई.
पांडुरंग जाधव
उपोषण कर्ता
कोवाड ता.चंदगड
चलो मुंबई - मार्ग
२० जानेवारी २०२४
सकाळी 9 वा- अंतरवाली सराटी पासून पद यात्रेस सुरुवात होईल
दुपारी भोजन - कोळगाव ता गेवराई
रात्री मुक्काम - मातोरी ता शिरूर
*21 जानेवारी-*
दुपारी भोजन - तनपुरवाडी ता पाथर्डी
रात्रौ मुक्काम - बाराबाभली ( करंजी घाट )
*22 जानेवारी -*
दुपारी भोजन - सुपा
रात्री मुक्काम - रांजणगाव ( गणपती )
*23 जानेवारी -*
दुपारी भोजन - कोरेगावं भीमा
रात्री मुक्काम - चंदननगर ( खराडी बायपास ) पुणे
*24 जानेवारी -*
पुणे शहर प्रवास - जगताप डेअरी - डांगे चौक - चिंचवड - देहूफाटा
रात्री मुक्काम - लोणावळा
*25 जानेवारी -*
दुपारी भोजन - पनवेल.
रात्री मुक्कामी - वाशी
*26 जानेवारी -*
चेंबूर वरून पदयात्रा -
*आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क*
*मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे*
*दिनक्रम -*
*सकाळी पदयात्रा - दुपारी 12 पर्यत असेल*
त्यानंतर आपल्या वाहणाने प्रवास करून मुक्कामी ठिकाणी पोहचणे
*ज्यांना शक्य त्यांनी पायी चालावे* - ज्यांना शक्य नाही त्यांनी स्वतःच्या गाडीने प्रवास करावा. ज्यांना पूर्णवेळ येणे शक्य नाही त्यांनी अंतरवाली सराटी येथे पहिल्या दिवशी सहभागी व्हावे. भोजन व्यवस्था स्थानिक मंडळी करतील पण ते पुरेल याची खात्री नाही. म्हणून स्वतःचे अन्न सोबत ठेवावे किंवा तयार करावे. मुक्कामी गाडीजवळच झोपायचे आहे. प्रत्येकाने स्वयंसेवक व्हायचे आहे. व्यसन, जाळपोळ, उद्रेक मान्य नाही. डिझेल नसेल, गाडी खराब, पक्चर जाहली तर दुरुस्ती करून आरामाने यावे, धावपळ करू नये, प्रवासात पुढे असले काय आणि मागे असले काय? काहीच फरक नाही, सहभाग महत्वाचा आहे.
No comments:
Post a Comment