र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2024

र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड: येथील र. भा. माडखोलकर  महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभाग,  इनोव्हेशन अँड इनक्यूबेशन सेंटर आणि निलया फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्टार्ट अप आणि फॅमिली बिजनेस मॅनेजमेंट' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी अध्यक्षस्थानी डॉ. ए. वाय. जाधव होते.  प्रास्ताविक व  चर्चासत्राचे उदेश समन्वयक डॉ. एस. डी. गोरल यांनी  विषद केले.      

         उद्घाटनानंतर पहिल्या तांत्रिक सत्रांमध्ये पुणे येथील चेतन गोडबोले यांनी जी व्यक्ती नेहमी बदलाचा शोध घेऊन त्याचा संधी रूपांतर करून त्यातून नवनिर्मिती करते आणि समाजाच्या वेगवेगळ्या गरजा भागविण्यासाठी निरंतर प्रयत्नशिल रहाते तिच व्यक्ती उद्योजक म्हणून गनली जाते असे प्रतिपादन केले. त्यांनी स्टार्टअप योजनेबाबत सविस्तर माहिती सांगून नवंउद्योजकाना उपक्रम सुरू करण्याची सुलभ कार्यपद्धती आणि वित्तीय प्रोत्साहने या स्टार्टअप योजनेद्वारे कशी प्राप्त होतात. तसेच बेकारी नष्ट करण्यासाठी युवकांना शासनाकडून विविध प्रकारच्या सुविधा कोणत्या आहेत याबाबत सविस्तर विवेचन केले. स्टार्टअप बिजनेस युनिटची विविध उदाहरणे त्यांच्या समोर मांडली.

     अध्यक्षीय समारोप करताना डॉ. जाधव यांनी फॅमिली बिजनेस मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन करताना उद्योजक होण्यासाठी व्यक्ती ही अतिशय जिद्दी, चिकाटी आणि उत्कृष्ट नियोजन करणारी तसेच ग्राहकांशी सलोखा साधणारी असावी, प्रसंगी व्यवसाय मध्ये अपयश आले तरी ते सहज स्वीकारून त्यावर मात करणारे असावे असे मत व्यक्त केले.  ते पुढे म्हणाले व्यवसाय सुरू करताना थोडी कमी गुंतवणूक आणि जास्त अनिश्चित परिस्थितीचा लाभ घेण्याची व्यूहरचना करावी लागते. व्यवसाय निवडीसाठी आवश्यक जागा खूप महत्त्वाचे असते आणि त्याच्यात नवनिर्मिती अधिक महत्त्वाचे ठरते असे सांगून याबाबतची ज्वलंत उदाहरणे दिली. उदा . शैक्षणिक संकुल शेजारी चहा, कॉफी हॉटेल, मोबाईल विक्री सेंटर, शैक्षणिक साहित्य, फोटोग्राफी व्यवसाय इत्यादी व्यवसाय योग्य पद्धतीने करता येतो, असे स्पष्ट केले.

दुसऱ्या सत्रामध्ये श्री साईनाथ ढगे यांनी फॅमिली बिजनेस मॅनेजमेंट विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना जपान येथील एक हजारहुन अधिक काळ फॅमिली बिजनेस यशस्वी वाटचाल करीत आहे असे सांगितले.  अशा व्यवसायामधील नवीन संकल्पना निश्चितच तेथील समाज्याच्या राहणीमानात सुधारणा होते व परावलंबित्व नष्ट होते.

     या कार्यक्रमांमध्ये  डॉ. यशवंत पाटील यांच्यासह 156  महाराष्ट्र व कर्नाटक राज्यतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन ए. डी कांबळे यांनी केले तर आभार अंजनी पाटील यांनी मांडले‌.

 या प्रसंगी विविध लहान मोठ्या उद्योगाचे माझी विद्यार्थ्यांच्या प्रोत्सांहनासाठी स्टॉल मानले होते.

No comments:

Post a Comment