माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महिलांचे आरोग्य आणि हळदीकुंकू कार्यक्रम विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2024

माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महिलांचे आरोग्य आणि हळदीकुंकू कार्यक्रम विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये संपन्न



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

   र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये महिलांचे आरोग्य आणि समस्या व हळदीकुंकू कार्यक्रम दि. 20 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. स्नेहल मुसळे पाटील यांनी यावेळी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. बदलत्या युगाबरोबरच बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांनी अधिकाधिक सतर्क असणे हे 21 व्या शतकातील विज्ञान आणि तंत्रज्ञान युगामध्ये अपेक्षित आहे असे मत त्यांनी मांडले. वाढत्या वयाबरोबर महिलांच्या मध्ये होणारे बदल हे घरातील प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक आहे. एक आरोग्यपूर्ण व सुदृढ महिलाच भारताचा भविष्यातील समाज घडवू शकेल असेही त्या पुढे म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मजरे शिरगाव गावच्या पोलीस पाटील सौ. आरती भोगन यांनी यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराला शुभेच्छा दिल्या व अशा कॅम्पमुळेच महिलांच्या मध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण होते असे मत व्यक्त केले. 

    सौ. प्रमिला पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये हळदीकुंकू कार्यक्रम हा फक्त एक धार्मिक विधी नसून एक वैचारिक देवाण-घेवाण आहे त्यामुळे जुन्या रूढी परंपरांना फाटा देऊन अशा कार्यक्रमांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे व नवीन पिढीमध्ये श्रमाचे संस्कार रुजविणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. एस एन पाटील यांनी यावेळी उपस्थित महिलांनी या सात दिवशीय निवासी शिबिराच्या बौद्धिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. 

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पूजा कुट्रे यांनी केले. पाहुण्यांची ओळख शुभम हसुरे यांनी केली, सूत्रसंचालन संस्कृती वाके हिने केले तर आभार प्रतीक्षा गावडे हिने मानले. या कार्यक्रमासाठी मजरे शिरगाव, मौजे शिरगाव आणि सावर्डे या तिन्ही गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी डॉ. ए पी पाटील, प्रा. एस बी दिवेकर, सौ मंगल वाके, सौ. दीपांजली गावडे, सौ स्मिता कुंदेकर, सौ कल्पना गावडे, सौ अंजली गावडे, सौ सुनंदा कुंदेकर, सौ संगीता गावडे, सौ सुरेखा फाटक, सौ पद्मजा सामंत, सौ रेणुका तेजम, सौ जनाबाई गावडे, सौ चित्रा शिरगावकर ,सौ माधुरी जाधव, सौ अंजली मुळीक, सौ तेजस्वी पाटील, सौ राजश्री गावडे, सौ कमल गावडे व इतर महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment