चंदगड / सी. एल. वृतसेवा
र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत मजरे शिरगाव, मौजे शिरगाव आणि सावर्डे या गावी दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी झाले. या सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटक मजरे शिरगाव या गावचे प्रथम नागरिक प्रकाश गोपाळ सुतार यांनी नियोजित कामाचा आराखडा यावेळी स्वयंसेवकासमोर मांडला.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा समन्वयक डॉ. एस. एन. पाटील यांनी या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक करत असताना या निवासी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी सर्व स्वयंसेवकांचे उद्बोधन केले. महाविद्यालयातील चार भिंतींमध्ये बंदिस्त राहून फक्त बुद्ध्यांक वाढविता येतो आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झाल्यामुळे समाजातील विविध समस्यांची विद्यार्थ्यांना जाणीव होते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही राष्ट्र कार्यासाठी सतत प्रेरित असते असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडुत शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. आर. पी. पाटील सर होते. महाविद्यालयातील विद्यार्थी हा आपल्या औपचारिक शिक्षणाबरोबरच विविध संस्कार घेऊन बाहेर पडणे अपेक्षित असते आणि हे संस्काराचे धडे देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असते. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास होतो असे मत यावेळी प्रा. आर. पी. पाटील सर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बोलत असताना प्रा. व्ही. के. गावडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा स्वयंशिस्तीने आणि स्वयंप्रेरणेने घडत असतो असे मत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच मोहन कुंदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. एन. के. पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य विलास वाके, ग्रामपंचायत सदस्या, पोलीस पाटील आणि इतर मान्यवर तसेच समितीचे सदस्य डॉ. एन. एस. मासाळ, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. पूजा कुट्रे, डॉ. टी. एम. पाटील, डॉ. टी. ए. कांबळे, प्रा. एल. एन. गायकवाड, डॉ. के. एन. निकम, डॉ. ए. वाय. जाधव, श्री मारुती माडखोलकर, श्री शिवराज हासुरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment