संजय साबळे यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र माध्यमिक संघाचा पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2024

संजय साबळे यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र माध्यमिक संघाचा पुरस्कारमाणगाव : सी. एल. वृत्तसेवा

         बांटिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे पार पडलेल्या ४१ व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यापक संजय साबळे यांना कै. पार्वतीबाई पोटे राज्यस्तरीय मराठी शिक्षक कवी प्रेरणा पुरस्कार `काही बोलायचे आहे.  या काव्यसंग्रहाला तर `आई शपथ खरं सांगतो` या बालसाहित्याला कै. वसंत पालेकर स्मृति पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  रोख रक्कम व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. 

   महाराष्ट्रातील मराठी अध्यापकांनी लिहिलेल्या पुस्तकांना संघामार्फत दरवर्षी प्रेरणा पुरस्कार म्हणून रोख रक्कम दिली जाते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय कुमार लांडगे होते. माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे, शिक्षण उपसंचालक, डॉ. रमा भोसले, आमदार निरंजन डावखरे, डॉ. प्रीती महाजन, प्राचार्य भगवान माळी, भरत गावडे, शंकर लावंड, शलाका वेलणकर, रंगनाथ सुंभे उपस्थित होते.

                                            बातमीदार - राजेंद्र शिवणगेकर

No comments:

Post a Comment