चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्थ संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कॉमर्स विभाग व पुणे येथील निलया एज्युकेशन ग्रुप यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी निलया ग्रुपचे सहाय्यक प्रा. चेतन गोडबोले, साईनाथ ढगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. जी. जे. गावडे, प्रा. जी. पी. कांबळे, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. सौ. एम. एन. पाटील, डॉ. अनिल गवळी, डॉ. अरुण पाटील, नॅक समन्वयक डॉ. राजेश घोरपडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. जी. जे. गावडे यांनी केले. यावेळी चेतन गोडबोले यांनी त्यांच्या एज्युकेशन ग्रुप मध्ये असलेल्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी तसेच वेगवेगळे कोर्सेस व शंभर टक्के नोकरीची हमी याबाबतची माहिती दिली कार्यक्रमाचे आभार हर्षद कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन आरती धामणेकर यांनी केले.
No comments:
Post a Comment