कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील संतोष कामील राऊत यांची चंदगड तालुका दलित महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या सुचनेनुसार जिल्हा अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी निवडीचे पत्र दिले. राऊत यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. समाज बांधवांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करु तसेच सर्वाना बरोबर करुन संघटना मजभूत करणार असल्याचे अभिवचन राऊत यांनी दिले. यावेळी प्रदेश अध्यक्ष पुष्पलता सकटे, विलास कांबळे, अंजूम देसाई, मारुती अनावरे, विठ्ठल कांबळे हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment