चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत महाविद्यालयमध्ये भरडधान्य प्रदर्शन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी चंदगड तालुक्यामधील विविध भरड धान्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. संयुक्त राष्ट्र संघ व जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने २०२४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष म्हणून सगळ्या जगामध्ये साजरे केले जाते आहे.
वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी ,नाचणी, जोंधळा, सावा,वरी,या तृण धान्याचे प्रदर्शन मांडले होते. या तृण धान्याचे आहारातील महत्व सांगून उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.व्ही.पाटील यांनी केले.या तृण धान्य प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थचे उपाधक्ष संजय पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव विशाल पाटील बोलताना म्हणाले भरड धान्य हे पौष्टिक अन्न असून ती पचायला देखील हलकी असतात. त्यामुळे आरोग्य उत्तम राहायला मदत होते. संपूर्ण जगाबरोबर च भारतामध्ये सुद्धा भात आणि गहू या दोन पिकांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. व आहारामध्ये जास्त वापर केला जातो.मात्र नचन,बाजरी सावा,वरी यासारख्या पौष्टिक तृण धान्याकडे संपूर्ण जगाचे दुर्लक्ष आहे.या तृण धान्याचा गल्यासमिक इंडेक्स कमी असल्यामुळे आहारामध्ये त्यांचा वापर वाढला पाहिजेत.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.बी.डी.अजळकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडील,तसेच शेजारी व गावातील शेतकरी यांना तृण धान्याचे उत्पादन घेण्यासाठी व आहारामध्ये त्यांचा वापर करण्यासाठी प्रबोधन करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आर. व्हीं पाडवी, डॉ.ए.पी गवळी ,डॉ.आय आर जरळी, डॉ.राजेश घोरपडे,एन.पी. पाटील . ए. व्ही नौकुडकर , सौ.सावरे ,संदीप पाटील,संजय कांबळे,युवराज रोड व इतर प्राध्यापक,कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कोमल होनगेकर तर आभार हर्षदा केरुडकर हिने केले.
No comments:
Post a Comment