कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
सांगली येथे रविवार दि. 14/01/2024 रोजी घेण्यात आलेल्या सांगली, कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी जिल्हा अंतर्गत विभागीय कराटे स्पर्धेत ढोलगरवाडी तालुका चंदगड येथील मामासाहेब लाड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात दणदणीत यश प्राप्त केले. ग्रामीण भागात म्हणावे तसे अजून न पोहोचलेल्या या क्रीडा प्रकारात मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील प्रमाणे.
खुला गट - साईराज मारुती पाटील गोल्ड मेडल व काटा क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले. कु. वैष्णवी परशराम कांबळे 12 वर्षे वयोगट कराटेत व कटा दोन्ही प्रकारात कांस्यपदक. तेजस मधुकर बोकडे 11 वर्षे वयोगट कराटेत कांस्य व कटा क्रीडा प्रकारामध्ये रौप्य पदक. अशी लक्षवेधी कामगिरी केली यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक आदिनाथ गावडे, मुख्याध्यापक एन. जी. यळळूरकर व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा राजेंद्र भीमसेन पाटील (पोलीस पाटील ढोलगरवाडी) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment