दक्ष कलेक्शन कोवाड येथे 'श्रीराम कुर्ता' खरेदीसाठी गर्दी - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2024

दक्ष कलेक्शन कोवाड येथे 'श्रीराम कुर्ता' खरेदीसाठी गर्दी

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        दक्ष कलेक्शन कोवाड (ता. चंदगड) येथे आयोध्यातील श्रीराम मंदिर उद्घाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 'श्रीराम कुर्ता' खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.  दक्ष कलेक्शन  मार्फत वर्षभर ग्राहकांना विविध डिस्काउंट ऑफर दिल्या जातात. आता श्रीराम मंदिर उद्घाटन चे औचित्य साधून दक्ष कलेक्शनचे मालक पी के गायकवाड यांनी श्रीराम, जय श्रीराम आदी प्रिंट चे  विविध साईज व रंगातील कुर्ते ग्राहकांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून दिलेले आहेत.

      किरकोळ विक्रीचे माफक दर व २० नगावरील ग्रुप खरेदीसाठी होलसेल दरात विक्री सुरू आहे. ग्राहकांच्या मागणी व पसंतीनुसार वर्षभर ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या ऑफर्स दक्ष कलेक्शन कडून देत ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्ती केली जाते. दर्जेदार व फ्रेश माल माफक दर यामुळे दक्ष कलेक्शन चे नाव चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव तालुक्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून विविध परिसरातील ग्राहक दक्ष कलेक्शन कोवाड ला भेट देत आहेत.

No comments:

Post a Comment