'लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे' घोषणा देत एक महिना पुरेल इतका शिधा घेऊन लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2024

'लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे' घोषणा देत एक महिना पुरेल इतका शिधा घेऊन लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने

 


जालना : सी. एल. वृत्तसेवा

      मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून घेण्यासाठी मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला साद घालीत हजारो, लाखो मराठा बांधव हे मुंबईकडे निघाले आहे.

     जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बु येथील मराठा समाज हा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हाण्यासाठी मुंबई वारीला जाण्यासाठी निघाले.

    एक मराठा लाख मराठा, 'जय भवानी जय शिवराय', लढेंगे और जितेंगे हम सब जायेंगे अशा घोषणा देत बोरगाव बुद्रुक येथील मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले.

      आपला जवळपास एक महिन्यांचा संसार थाटला असुन, मोबाईल चार्जिंग साठी प्लग, रात्रीचे अंधारात लाईटची व्यवस्था, जवळपास 200 लिटरच्या पाण्याच्या टाक्या, झोपायला गाद्या व स्वयंपाक करण्यासाठी गॅस व किमान एक महिना पुरेल इतके भोजन साहित्य घेऊन मराठा समाज बांधव मुंबईकडे निघाले आहे.

                           मराठा- मुस्लिम एकता

        मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गावातील सर्वच जाती-धर्मातील लोकांनी पाठिंबा दिला. मुस्लिम बांधव हबीब पठाण हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईला निघाले.

No comments:

Post a Comment