महावितरणच्या वतीने शिनोळी औद्योगिक ग्राहकांसाठी स्वतंत्र विद्युत वाहिनी कार्यान्वित - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2024

महावितरणच्या वतीने शिनोळी औद्योगिक ग्राहकांसाठी स्वतंत्र विद्युत वाहिनी कार्यान्वित

 


चंदगड / प्रतिनिधी 

     महावितरणच्यावतीने शिनोळी (ता. चंदगड) औद्योगिक ग्राहकांसाठी नवीन स्वतंत्र विद्युत वाहिनी कार्यान्वित करण्यात आली. ३३/११ केव्ही एमआयडीसी हलकर्णी उपकेंद्रातून ती कार्यान्वित केली असून, उद्योगांकरिता अखंडित व दर्जेदार वीज पुरवठ्याची सोय झाली आहे.

   नवीन विद्युत वाहिनीकरिता पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार राजेश पाटील यांचे विशेष सहकार्य केले. जिल्हा नियोजन समितीच्या ३० लाख रुपयांच्या निधीतून दोन किलोमीटर लांबीची ही वाहिनी उभारली आहे.

     महावितरण तर्फे काल औद्योगिक वसाहत शिनोली येथे सर्व उद्योजक समवेत बैठक आयोजित करणेत आली. सदर बैठकीस महावितारण तर्फे अंकुर कावळे (अधीक्षक अभियंता कोहापूर मंडल कार्यालय महावितरण), विजयकुमार आडके (कार्यकारी अभियंता गडहिंगलज), विशाल लोधी, (उपकार्यकारी अभियंता चंदगड), गुरुदत्त मोरे (सहाय्यक अभियंता शाखा-हलकर्णी), विकास कणसे(सहाय्यक अभियंता शाखा-तुर्केवाडी) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अर्जुन पाटील  (अध्यक्ष शिनोली चेम्बर ऑफ कॉमर्स,शिनोळी,तालुका-चंदगड), व विलास शामराव देसाई (अध्यक्ष एम. आय. डी. सी. असोशीएशन हलकर्णी) होते. तसेच सर्व उपकार्यकारी अभियंता बसरिकट्टी उपकार्यकारी अभियंता, श्री. चौगुले(उपकार्यकारी अभियंता नेसरी), सूर्यवंशी(उपकार्यकारी अभियंता गडहिंगलज)या बैठकीला उपस्थित होते. 

     तसेच सर्व शाखा-हलकर्णी व शाखा तुर्केवाडी चे सर्व जनमित्र, सर्व यंत्रचालक सदर बैठकीस उपस्थित होते व सर्व कामांमध्ये उत्कृष्ठ सहकार्य लाभले. सर्व सन्माननीय उद्योजक यांनी आपल्या समस्या मांडल्या. त्याबाबत योग्य स्पष्टीकरण महावितरण तर्फे देणेत आले. समस्याचे निराकरण करणेत आले. भविष्यात येणाऱ्या RDSS च्या कामांबद्दल माहिती देणेत आली व महावितरण चे सक्षमीकरण होणार असले बाबत माहिती देणेत आली. सर्व उपस्थितांनी महावितरण च्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

     तसेच सर्व उद्योजकांच्या समस्या तत्काळ सोडवता याव्या यासाठी नवीनतम योजना, “स्वागत कक्ष “ स्थापण्यात आले असले बाबत विस्तृत माहिती देनेत आली. तसेच नवीन वीजपुरवठा घेनेसाठी च्या महावितरण च्या NSC scheme बाबत माहिती देण्यात आली. यावेळी ३३/११ के व्ही उपकेंद्र, एम. आय. डी. सी. हलकर्णी,चंदगड येथे उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते ११ के. व्ही. ची, ०२ कि. मी. लांबीची ची,  नवीन वाहिनी सुरु करणेत आली. त्या वाहिन द्वारे एम. आय. डी. सी. हलकर्णी मधील उद्योजकांना स्वतंत्र वाहिनी मिळाली व त्यामुळे दर्जेदार अखंडित विद्युत पुरवठा मिळनेस मदत होणार आहे. 

      मागील बैठकीत मान्य केलेप्रमाणे सदर नवीन वाहिनी तत्काळ मंजूर करणेत आली होती. व त्यासाठी रू.३० लाख एवढा निधी DPDC (कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती तर्फे) मंजूर करणेत आला होता. सदर निधी मंजुरीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, आमदार राजेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

No comments:

Post a Comment