तिलारी- दोडामार्ग घाटामध्ये अपघातांची मालिका सुरूच? अपघातग्रस्त टेम्पो काढताना क्रेन झाली रस्त्यावर पलटी, वाहतूक पुन्हा ठप्प - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2024

तिलारी- दोडामार्ग घाटामध्ये अपघातांची मालिका सुरूच? अपघातग्रस्त टेम्पो काढताना क्रेन झाली रस्त्यावर पलटी, वाहतूक पुन्हा ठप्प

तिलारी दोडामार्ग घाटातील अपघातग्रस्त टेम्पो काढताना क्रेनच रस्त्यावर पलटी होऊन अन्य वाहनांचे नुकसान झाले.

दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा 

       धोकादायक  तिलारी- दोडामार्ग घाटातील अवजड वाहने बंद करावी, अशी वारंवार मागणी करूनही चंदगड बांधकाम विभाग तसेच चंदगड वाहतूक पोलिस याकडे लक्ष देऊन उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्यामुळे अवजड वाहने अपघात होऊन घाट बंद होणे सुरूच आहे. 

     बुधवारी दुपारी तिलारी घाटात चार दिवसांपूर्वी लोखंडी सामान घेऊन जाणारा टेम्पो अपघात झाला होता हा टेम्पो काढण्यासाठी घाटात मोठी क्रेन आणली होती. हा टेम्पो काढताना चक्क क्रेन पलटी झाल्याने तिलारी घाट बंद होऊन दोन्ही बाजूंनी खाजगी वाहने एस टी बसेस अडकून पडल्या. यामुळे मोठी गैरसोय झाली. घाटाला लागलेली पनवती संपता संपेना,  बांधकाम विभाग यांच्या कारभारात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

      या घाटातून अवजड वाहनांना बंदी असूनही जवळचा मार्ग म्हणून अनेक वाहन धारक तिलारी घाट मार्गे गोवा येथे जाण्यासाठी या घाटाची निवड करतात. पण या धोकादायक घाटाचा चालकाना अंदाज नसल्याने अवजड वाहने धडकून तसेच अपघात होऊन घाट बंद होणे वाहने अडकून पडणे या घटना सतत घडत आहेत. बांधकाम विभाग चंदगड पोलिस कोणत्याही प्रकारची उपाययोजना करत नाही. दखल घेत नाहीत याचा फटका वाहन धारकांना प्रवाशांना बसत आहे. ऐवढे अपघात होऊन देखील बांधकाम विभाग डोळेझाक करत आहेत. 

     तीन दिवसांपूर्वी कोळसा वाहतूक करणारा सोळा चाकी ट्रक अडकून सहा तास घाट बंद होता. तर चार दिवसांपूर्वी मुंबई येथील लोखंडी सामान घेऊन जाणारा आयशर टेम्पो ब्रेक निकामी होऊन अपघात झाला होता. चालक अडकून पडला होता त्याला दिड तासांनी बाहेर काढले होते. 

       तिलारी घाटात अपघात झालेला हा टेम्पो बाहेर काढण्यासाठी बुधवारी दुपारी क्रेन आणली होती. धोकादायक ठिकाणी हा टेम्पो पडला होता. याला बाहेर काढण्यासाठी क्रेन काम करत असताना सदर क्रेन रस्त्यावर पलटी होऊन तिलारी घाट पुन्हा बंद पडल्याने गोवा तसेच बेळगाव कोल्हापूर येथे जाणारी वाहने तसेच एस टी बसेस अडकून पडल्या मोठ्या गैरसोयीचा सामाना नागरीकांना करावा लागला. झोपी गेलेल्या चंदगड बांधकाम विभाग यांनी तातडीने उपाययोजना करुन अवजड वाहनांना पायबंद घालावा अशी मागणी केली जात आहे. 

No comments:

Post a Comment