पारगड शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंगल नौकुडकर, व्हा. चेअरमनपदी संध्या सोनार यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2024

पारगड शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंगल नौकुडकर, व्हा. चेअरमनपदी संध्या सोनार यांची निवड

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा  

        चंदगड तालुक्यातील पारगड शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंगल संजय नौकुडकर तर व्हाईस चेअरमनपदी संध्या संजय सोनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या इतिहासात चेअरमन  व व्हाईस चेअरमनपदी महिलांची निवड होण्याची ही पहिलीच घटना आहे. या निवडीमुळे संस्थेच्या आर्थिक भरभराटीला चालना मिळेल, अशी मनोगते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

      चेअरमन पदासाठी दयानंद भरमाना पाटील यांनी नाव सुचविले तर रमेश बुरुड यांनी अनुमोदन दिले. व्हा  चेअरमन पदासाठी प्रकाश नांदूडकर यांनी नाव सुचवले तर अनिल पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी शिक्षक संघाचे (आम. शिवाजीराव पाटील गट) चंदगड तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, देव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विलास पाटील, व्हाईस चेअरमन अर्जुन चाळूचे, शिक्षक संघाचे मार्गदर्शक रमेश हुद्दार, शिक्षक संघाच्या  महिला जिल्हा उपाध्यक्ष  अलका  पाटील, संस्थापक डी एम पाटील, सर्व संचालक, सचिव मारुती दळवी आदींची उपस्थिती होती. 

       नूतन चेअरमन व  व्हाईस चेअरमन यांचा निवडी बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर चेअरमन मंगल नौकुडकर यांनी संस्थेच्या प्रगतीत कोणीही राजकारण न आणता सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी चेअरमन डी बी पाटील व व्हाईस चेअरमन बाबुराव कोरवी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment