चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात मतदार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नोडल अधिकारी प्रा. व्ही. के. गावडे यांनी प्रास्ताविकातून "युवकांनी आपल्या मताचे महत्त्व जाणावे.विवेकी पणाने मतदान करावे. देशाला योग्य आकार देण्याची संधी युवकांना मताच्या अधिकारामुळेच प्राप्त होते. तरुणांनी आपल्या जाणिवा प्रगल्भ केल्या पाहिजेत आणि सत्तेच्या राजकारणाला विधायक वळण लावण्यासाठी लोकशाहीने दिलेल्या मताच्या अधिकाराचे पावित्र्य जतन करायला हवे ."असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी `युवकांना प्राप्त झालेला मताचा अधिकार ही त्यांना मिळालेली फार मोठी देणगी आहे. मताधिकाराचे योग्य मूल्य जाणून घ्यावे आणि आपल्या लोकशाही प्रधान देशाचा एक सक्षम नागरिक म्हणून आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे असे आवाहन केले.`
तहसीलदार राजेश चव्हाण यांनी `मतदानाबाबत मतदारांची उदासीनता दूर करण्यासाठी युवकांनीच पुढाकार घेतला पाहिजे आणि आपले पवित्र कर्तव्य बजावताना कोणत्याही संकुचित विचारांना वा प्रलोभनाला बळी न पडता आपले कर्तव्य चोखपणे बजावण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.`.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवून प्रत्येकानेच वैचारिक दृष्ट्या परिपक्व होण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रा. एस. बी. दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर. एन. साळुंखे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment