कोवाड येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2024

कोवाड येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात

 


कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

         कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड (ता. चंदगड) येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. या प्रसंगी प्रा. डॉ. मोहन घोळसे, प्रा. सुनीता कांबळे प्रा. महेश मुत्नाले, परशराम पाटील, अशोक सावंत, शंकर पुजारी, सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक आप्पा वांद्रे उपस्थित होते.  आभार प्रा. संदीप पाटील यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment