शिनोळी बु. येथील अध्यापक गीतकार रवींद्र पाटील यांच्या 'अखंड महाराष्ट्राचा लढा' गीताचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2024

शिनोळी बु. येथील अध्यापक गीतकार रवींद्र पाटील यांच्या 'अखंड महाराष्ट्राचा लढा' गीताचे प्रकाशन

 

रवींद्र पाटील

शिनोळी / सी. एल. वृत्तसेवा

      शिनोळी बु. (ता. चंदगड) येथील राजर्षी शाहू विद्यालयातील मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक रवींद्र पाटील यांनी अखंड महाराष्ट्राचा लढा या त्यांच्या गीताचा ध्वनीमुद्रीत गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

     यावेळी जेष्ठ कादंबरीकार, साहित्यिक कृष्णात खोत संमेलनाध्यक्षपदी होते. सजोम ग्रुप पुणे सीईओ तुकाराम मेलगे - पाटील यांनी या गीताचे प्रकाशन केले. संमेलन आप्पासाहेब गुरव, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, अंकुश  केसरकर, शिवाजी हंगिरगेकर, शिवसंत संजय गुरव, ॲड. सुधीर चव्हाण यासह आदींच्या उपस्थितीत गीत पोस्टर अनावर करण्यात आले.

      या गीताचे गीतकार म्हणून रवींद्र पाटील यांनी सीमाभागातल्या व्यथा वेदनांचा हुंकार आणि सीमाभागातील एक गौरवगीत नक्कीच मराठी अस्मितेवर अधिराज्य गाजवेल व  या गीताचा सुगंध मराठी मुलखात दरवळत राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली.

      यावेळी  गीताचे संगीतकार शरद गोरे यांनी संगीतबध्द केले असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या सुमधूर पहाडी आवाजात  स्वरबद्ध केलेले आहे. सीमाभागावर अनेक काव्यरचना लिहिल्या आहेत. रवींद्र पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष  म्हणून कार्यरत असून  संमेलनाचे मुख्यसंयोजक आहेत. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या संमेलनाचे  स्वागताध्यक्ष म्हणून पद भूषविले आहे.

   चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत. शिवछत्रपती शिक्षण सेवकांची पतसंस्थेचे सल्लगार म्हणून नुकतीच निवड झाली आहे. तंत्रस्नेही शिक्षक, निवेदक, सुत्रसंचाक, पत्रकार व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत.

No comments:

Post a Comment