प्रा. डॉ. टी. एम. पाटील बोलताना. व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
"छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी जसे युद्ध केले तसेच स्वराज्याचे रूपांतर राज्यात करण्यासाठी उत्तम धोरण आखले. त्यांची हातात तलवार घेतलेली अश्वारूढ मूर्ती जशी त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी आहे. तशीच शांततेच्या काळात सुराज्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही दखल घेणे गरजेचे आहे. आजच्या काळात आपल्याला शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस बनायचे आहे. त्यांच्या विचारांचा प्रत्यक्ष आचार केल्यास निश्चितच आपला देश जगाच्या पाठीवर अग्रक्रमांकाचा ठरेल. महाराजांचे जीवन चरित्र समजून घेताना त्यांचे विचार आणि त्यांचे सर्वांगीण कार्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे." असे प्रतिपादन डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र. प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी शिवाजी महाराजांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते विश्ववंद्य आहेत. त्यांच्या युद्धतंत्राचा अभ्यास आजही जगभर केला जातो असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. प्रा. एस. डी. गोरल यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यीं उपस्थित होते.
No comments:
Post a Comment