समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज - प्राचार्य एन. डी. देवळे, चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील जुनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2024

समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज - प्राचार्य एन. डी. देवळे, चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील जुनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील जुनिअर कॉलेज चंदगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते करण्यात आले.  

        "आज समाजाला शिवरायांच्या आचार आणि विचारांची गरज आहे. कारण शिवचरित्रांमधूनच खऱ्या अर्थाने आपलं चरित्र समृद्ध होईल "असे प्रतिपादन प्राचार्य एन. डी. देवळे यांनी केले. ते शिवजयंती निमित्त विद्यालयात साजरा केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

      "दूरदृष्टीपणा, नैतिकता, प्रशासन, धोरणात्मक विचार, धैर्य आणि शौर्य हे विचार हे गुण हे छत्रपतींचे गुण आपण अंगीकारले तर आपण जीवनात नक्कीच यशस्वी होऊ" असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे टी. एस. चांदेकर यांनी केले. यावेळी प्रा. एस. एम. निळकंठ, बी. आर. चिगरे यांनी मनोगत व्यक्त केले.

        छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे निधी दीपक पाटील, हर्षवर्धन अशोक हळवणकर, श्रेया युवराज भवारी, दक्ष संदिप नांगरे, औंदुबर अशोक नाडगौडा, हर्षाली दुष्यंत शिंदे, गजानन चंद्रशेखर कोरी यांनी क्रमांक मिळविले. कार्यक्रमाला प्रा. दुष्यत शिंदे, एस. एम.  नाडगौडा, जे. जी. पाटील, डी. जी. पाटील, टी. खंदाळे, पुष्पा सुतार, अर्चना रेडकर 'कविता बांदिवडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे तर आभार शरद हदगल यांनी मांडले.

No comments:

Post a Comment