नागरदळे येथील तानाजी पाटील गुरूदेव पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2024

नागरदळे येथील तानाजी पाटील गुरूदेव पुरस्काराने सन्मानित

 

नागरदळे येथील तानाजी पाटील यांना गुरूदेव पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

    मुळचे नागरदळे (ता. चंदगड) येथील रहिवाशी असलेले व सध्या कोल्हापूर येथील भाई माधवरावजी बागल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विक्रमनगर शाळेत कार्यरत असलेले जेष्ठ शिक्षक तानाजी रामू तथा टी. आर. पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्था गगनबावडा (जि. कोल्हापूर) संस्थेकडून श्री गुरुदेव पुरस्कार माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     यावेळी सर्वोदय शिक्षक शैक्षणिक संस्थाध्यक्ष रफिक काझी, खजिनदार भगवान सुतार, रजिउल्ला जमादार, निवृत्त सुभेदार मेजर व्ही. आर. पाटील होते. टी. आर. पाटील हे २८ वर्षापासून भाई माधवराव बागल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विक्रमनगर शाळेत गणित विषयाचे अध्यापण करत आहेत. कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून ओळख आहे. अनेक गरिब गरजू मुलांची शैक्षणिक फी स्वखर्चाने भरून मदत करत आहेत. तसेच अनेक सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत करण्यास पुढाकार असतो. गरूदेव पुरस्कार मिळाल्याबद्दल भाई माधवराव बागल हायस्कूल व ज्युनिअर कडून शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. कोळेकर, पर्यवेक्षक व्हि. ए. पाटील, नंदकुमार घोरपडे व सर्व शिक्षक यांच्याकडून सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक गौरव रेळेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment