निवडीच्या पत्र मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना विजयकुमार कांबळे |
चंदगड / प्रतिनिधी
आमरोळी (ता. चंदगड) येथील डाॅ. विजयकुमार तुकाराम कांबळे यांची ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी चंदगड तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व निर्भीड पत्रकार म्हणून गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी आज सगळीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. सामान्य माणसाला आपले काम शासकीय अधिकारी, कर्मचारी वेळेत करुन देत नाहीत. मनमानी पद्धतीने लाच मागतात. तेव्हा अशा लाच मागणाऱ्या अधिका-याना वेळीच रोखले पाहिजे. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करावे असे सांगितले.
यावेळी विजयकुमार कांबळे म्हणाले गेल्या पंचवीस वर्षांपासून मी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी सर्वच क्षेत्रात मी प्रामाणिकपणे काम करत आहे. माझ्या आई - वडीलांनी, गुरुजनांनी माझ्यावर केलेले संस्कार आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादामुळे माझी वाटचाल सुरू आहे. यापुढे ही मी समाजातील गोरगरीब लोकांच्या साठी तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करीन असे यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष अन्वेश देशमुख, महिला संपर्क प्रमुख शितल महाजन, स्नेहा देसाई, कोल्हापूर जिल्हा महिला उपाध्यक्ष संगिता कांबळे, शिरोळ तालुकाध्यक्ष पुनम सुंटे, सौ. वसुंधरा कांबळे, रमेश पाटील, प्रभाकर सुतार, पिंटू गुरव, अनिल नांगनूरकर, प्रभाकर कांबळे, संजय यादव, परशराम वांईगडे, महादेव सुतार, रविंद्र वाईंगडे, सचिन वाईंगडे, संदीप वाईंगडे, बाळू गावडे, यांच्यासह शिवगर्जना तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभार सट्टूपा फडके यांनी मानले.
No comments:
Post a Comment