डेना -ॲटलास ग्रुपने पटकावला 'पत्रकार चषक-२०२४', महावितरण संघ ठरला उपविजेता...!, स्पर्धेत शासकीय, निमशासकीय २४ संघांचा सहभाग, स्पर्धेचे दुसरे वर्ष - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2024

डेना -ॲटलास ग्रुपने पटकावला 'पत्रकार चषक-२०२४', महावितरण संघ ठरला उपविजेता...!, स्पर्धेत शासकीय, निमशासकीय २४ संघांचा सहभाग, स्पर्धेचे दुसरे वर्ष

 

प्रथक क्रमांकाचा फिरता चषक स्विकारताना डेना ग्रुपचे खेळाडू.

संपत पाटील, चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

   चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 'पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२४' क्रिकेट स्पर्धेत डेना ग्रुप (ॲटलास) संघाने अजिंक्यपदाचा चषक व दक्ष कलेक्शन फिरता चषक पटकावला. गतवर्षीचा विजेता महावितरण संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंडॉल क्रिकेट क्रीडांगण हिंडगाव फाटा, बेळगाव वेंगुर्ला हायवे येथे झालेल्या अंतिम सामन्यात टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ८ षटकात डेना ग्रुपने १०४ धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना महावितरण संघाचे मुख्य खेळाडू लवकर बाद झाल्याने त्यांना ५५ धावांपर्यंत मजल मारता आली.

प्रथम क्रमांकाचा चषक पत्रकार संघाकडून स्विकारताना डेना ग्रुपचे खेळाडू.

      अंतिम सामन्याची नाणेफेक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केली. यावेळी माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, संस्थापक अनिल धुपदाळे, स्पर्धा प्रमुख संपत पाटील, पत्रकार संघाचे पदाधिकारी चेतन शेरेगार, संतोष सुतार,  संजय पाटील, राहुल पाटील, निंगाप्पा बोकडे, तातोबा गावडा, विलास कागणकर आदी पत्रकार, दक्ष कलेक्शन कोवाडचे मालक पी. के. गायकवाड, पंच अभिजीत गुरबे, अभिजीत तळगुळकर, रमेश देसाई उपस्थित होते.


         तत्पूर्वी सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात डेना ग्रुप ने कृषी सेवा केंद्र संघाचा तर दुसऱ्या सामन्यात महावितरण संघाने माध्यमिक शिक्षक संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात माध्यमिक शिक्षक संघाने कृषी सेवा केंद्र संघाचा पराभव केला. स्पर्धेत एकूण २४ मातब्बर संघांचा सहभाग होता.

      सर्व संघांची प्रत्येक गटात ४ अशा ६ गटात विभागणी करण्यात आली होती. यापैकी चंदगड न्यायालय, चंदगड पत्रकार संघ, कृषी विभाग, एसटी महामंडळ, चंदगड पोलीस, महावितरण, पीडब्ल्यूडी, माध्यमिक शिक्षक, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, वन विभाग, सिनीयर पोलीस हे १२ संघ पहिल्या ग्रुप मध्ये होते. 

     तर ग्रुप दोन मध्ये एलआयसी, नगरपंचायत चंदगड, डॉक्टर असोसिएशन, बँक व पतसंस्था, खेडूत स्पोर्ट्स, महाविद्यालयीन प्राध्यापक, पतसंस्था फेडरेशन, केमिस्ट असोसिएशन, महा-ई-सेवा केंद्र, कृषी सेवा केंद्र, श्रमिक शेतकरी, डेना ग्रुप (ॲटलास) या संघांचा समावेश होता. केवळ सुट्टीच्या दिवशी या स्पर्धा खेळवण्यात येत असल्याने तब्बल अडीच महिने या स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यांचा आनंद चंदगड तालुक्यातील क्रिकेट शौकिनांनी घेतला. 

अंतिम सामना जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना डेना ग्रुपचे खेळाडू.

       स्पर्धेचे उद्घाटन न्यायाधीश चारुदत्त शिपकुले यांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारी पत्रकार दिनी पार पडले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अली मुल्ला पीडब्ल्यूडीचे अभियंता इफ्तेकार मुल्ला, पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे, चंदगडचे नगरसेवक अभिजीत गुरबे, बाळासाहेब हळदणकर, उद्योजक सुनील काणेकर उपस्थित होते. 

उद्घाटनाचा सामना पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभाग विरुद्ध चंदगड पोलीस यांच्यात झाला यावेळी नाणेफेक करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक नितीन सावंत व संघातील अधिकारी कर्मचारी खेळाडू
    स्पर्धा पार पाडण्यासाठी सल्लागार कमिटी अध्यक्ष चंदगडचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश चारुदत्त शिपकुले, पोलीस निरीक्षक नितीन सावंत, तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत आदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा पार पाडण्यासाठी पत्रकार संघाचे संतोष सावंत भोसले, सदस्य उत्तम पाटील, शहानुर मुल्ला, सागर चौगुले, विश्वास पाटील, जोतिबा पाटील, एस. के. पाटील, महेश बसापुरे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment