यशस्वी मध्यस्थी नंतर माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडताना सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार उर्फ शेलारमामा व सहकारी
दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा
सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवर असलेल्या शिवकालीन पारगड किल्ला ते मोर्ले सुरू झालेले रस्ता काम गेल्या चार वर्षापासून बांधकाम विभाग वन विभागाच्या आठकाठी मुळे चार वर्षे बंद आहे. यामुळे दशक्रोशील ग्रामस्थांना अनेक यातना सोसाव्या लागत आहे. जवळची पायवाट ती देखील रस्ता काम करताना बंद केली यामुळे दोडामार्ग येथे येण्यासाठी ६० किलोमीटर फेरा मारावा लागत होता. या रस्त्याचे काम सुरू करावे यासाठी पारगड मोर्ले दशक्रोशील ग्रामस्थ यांनी दोडामार्ग बांधकाम विभाग येथे दिनांक 20 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते. हे उपोषण माजी आमदार व भाजप नेते राजन तेली यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून पंधरा दिवसांत काम सुरू केले जाईल असे सांगितले. तेली यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सायंकाळी मागे घेतले.
दोडामार्ग बांधकाम विभाग कार्यालयासमोर मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता प्रश्नी उपोषणाला बसलेले ग्रामस्थ |
दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले ते पारगड किल्ला हा जवळपास आठ ते दहा किलोमीटर लांबीचा रस्ता यातील काही भाग दोडामार्ग तर काही भाग चंदगड वन विभाग यांच्या हद्दीतून जातो. चार वर्षापूर्वी वन हद्दीतील झाडे तोडून रस्ता कामाला सुरुवात झाली. पण दोडामार्ग हद्दीत काम कठीण होते. डोंगर कपारी दरी यातून रस्ता करणे जोखमीचे असताना या ठिकाणी कमी निधी दिला तर चंदगड हद्दीत काम कठीण नसताना जास्त निधी अशी स्थिती निर्माण झाली. तरी ठेकेदारांनी काम केले. पण निधी अभावी वन विभाग यांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही त्यामुळे वन विभाग यांनी काम रोखले.
मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता रखडलेले काम याला मुदतवाढ घेणे ही बांधकाम विभाग यांची जबाबदारी होती पण वेळेत प्रस्ताव गेला नाही त्यामुळे मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता काम चार वर्षे रखडले. या कडे कुणी लक्ष देत नाही त्यामुळे संतापलेल्या पारगड, मोर्ले दशक्रोशील ग्रामस्थ यांनी २० फेब्रुवारी रोजी दोडामार्ग बांधकाम विभाग यांच्या कार्यालय ठिकाणी उपोषणाला सुरूवात केली. यावेळी बांधकाम विभाग विजय चव्हाण यांनी उपोषण कर्ते यांच्या सोबत चर्चा करून काही अडचणी ग्रामस्थ यांच्या समोर मांडल्या. कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता वाहतूकीसाठी खुला झाला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे. असे सांगितले. किल्ला वासिय ग्रामस्थ यांनी उपोषण सुरू केले आहे. याची माहिती मिळताच भाजपाचे नेते माजी आमदार राजन तेली, तालुका अध्यक्ष सुधीर दळवी यांनी भेट देऊन चर्चा केली. हा रस्ता झाला पाहिजे यासाठी रघुवीर शेलार, ज्ञानेश्वर चिरमुरे, माजी सरपंच सुजाता नाईक, प्रदीप नाईक, सरिता मसुरकर, राजेश चिरमुरे, मिरवेल सरपंच तुकाराम सुतार, संतोष पवार, प्रकाश नाईक, हरिश गवस, देवीदास पवार, विश्राम गवस, संतोष मौर्य, प्रविण गवस, विनय रेडकर, संतोष गवस, मोर्ले सरपंच महादेव गवस, नामदेव सुतार, रमावती पारगडकर, पंकज गवस आदींनी सहभाग घेतला होता.
उपोषण कर्त्यांनी जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. अशी भूमिका घेतली होती. तथापि माजी आमदार राजन तेली यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. तेली यांनी "आपण बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन काम सुरू करुन पावसाळ्यात येण्याजाण्यासाठी रस्ता खुला करणे आपली जबाबदारी" असे सांगितले. या नंतर तेली यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. बांधकाम विभाग अधिकारी विजय चव्हाण यांनी आमच्याकडून वनविभागाला प्रस्ताव सादर केला असून इतर माहिती दिली.
No comments:
Post a Comment