संभाजी महाराज बलिदान मास दिनानिमित्त चंदगड नाभिक समाजाकडून मोफत केस कर्तन सेवा - चंदगड लाईव्ह न्युज

12 March 2024

संभाजी महाराज बलिदान मास दिनानिमित्त चंदगड नाभिक समाजाकडून मोफत केस कर्तन सेवा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुका नाभिक समाज संघटना व चंदगड शहर नाभिक समाज संघटना यांच्याकडून संभाजी महाराज बलिदान मास दिनाचे अवचित साधून एक दिवस मोफत केस कर्तन सेवा करण्यात आली. यामध्ये तुडये विभागातून सागर जाधव यांनी 90 लोकांचे मोफत केस कर्तन सेवा केली. चंदगड शहर मधून नाभिक समाजाचे दुकान मालक अध्यक्ष प्रसाद वाडकर, जिल्हा संघटक विशाल संकपाळ, सुजित वाडकर, संतोष वाडकर, मयूर लाटगावकर, विजय नावलगी, सतीश जगताप, आदिनाथ शिवनगेकर, साहिल वाडकर, सुरज शिवनगेकर यांनी ही सेवा केली. वर्षभर आपण पैशाच्या मोबदल्यात केस करताना करत असतो. पण छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास दिनाचे अवचित साधून नाभिक समाजाने केलेली या सेवेबद्दल संपूर्ण चंदगड तालुक्यातील समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment