माणगाव येथे कृषी जागृती कार्यक्रमांतर्गत कमी खर्चात शितगृह उभारणी प्रात्यक्षिक, कृषी कन्यांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2024

माणगाव येथे कृषी जागृती कार्यक्रमांतर्गत कमी खर्चात शितगृह उभारणी प्रात्यक्षिक, कृषी कन्यांचा सहभाग

 


तेऊरवाडी  / सी. एल. वृत्तसेवा

      माणगाव (ता चंदगड ) येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथील कृषीकन्यांकडून शून्य ऊर्जेवर अधारीत शीतकक्षाची उभारणी करण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. भाजीपाला फुले, फळे काढणीनंतर फळांमध्ये रासायनिक क्रिया होत असतात व पिकवलेला माल लवकर सडून किंवा कुजून जातो. अशा पिकवलेल्या मालाला शीतगृहाची अवश्यकता भासते. शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज अर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. याचा विचार करून हे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यात सहभागी विद्यार्थीनी म्हणजेच कृषीकन्या  मृणालिनी देसाई ,पल्लवी हांडे, श्रद्धा पाणदारे, वेदिका कांबळे, अनामिका घोलप, प्रतिक्षा खरात  होत्या. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एन. शेलार, डॉ. एस. एम. घोलपे, डॉ.वाय. व्ही. पाटील, प्रा. व्ही. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक करण्यात आले.

       तर माणगाव येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांकडून चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रकिया केलेला चारा २१ दिवसांनी गुरांना देण्याचा सल्ला कृषिदूतांनी दिला. चारा प्रक्रियेसाठी घेतलेल्या युरियाचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, असे सांगत हा चारा सहा महिन्यांखालील गुरांना तसेच गाभण गुरांना देऊ नये; असे मार्गदर्शनही करण्यात आले. या वेळी कृषीकन्या मृणालिनी देसाई, पल्लवी हांडे, श्रद्धा पाणदारे, वेदिका कांबळे, अनामिका घोलप, प्रतिक्षा खरात उपस्थित होते. त्यांना प्राचार्य डी. एन. शेलार, समन्वयक डी. एस. एम घोलपे, डॉ. के. बी. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

       डॉ. डॉ. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांकडून ऊसामधे सध्या सर्वात जास्त प्रार्दुभाव असलेल्या 'हुमनी' या कीडीचे मेटाराईझम' च्या वापराने कशा प्रकारे नियंत्रण करावे, तसेच त्याचे होणारे फायदे, त्याचप्रकारे मेटाराईझमची वापरण्याची पद्धत याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले जात आहे. कृषिकन्या  मृणालिनी देसाई, वेदिका कांबळे, अनामिका घोलप, पल्लवी हांडे, श्रध्दा पाणदारे, प्रतिक्षा खरात यानी हे प्रात्यक्षिक सादर केली. या प्रात्यक्षिकांसाठी प्राचार्य डी. एन. शेलार, प्रा. आर. आर. पाटील, प्रा. व्हि.एन.पाटील ,प्रा. एस. एम. घोलपे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment