तेऊरवाडी येथे रामनवमीला होणार जंगी कुस्ती मैदान - चंदगड लाईव्ह न्युज

14 April 2024

तेऊरवाडी येथे रामनवमीला होणार जंगी कुस्ती मैदान

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      तेऊरवाडी ग्रामस्थ व श्री राम तालिम मंडळ तेऊरवाडी (ता. चंदगड) यांच्या वतीने बुधवार दि १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्यात ६३ कुस्त्या होणार आहेत. कर्नाटक व महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या आखाड्या मध्ये उपस्थित राहणार आहेत. कुस्ती शौकीनांनी या आखाड्याचा लाभ घेण्याचे आवाहन तेऊरवाडी ग्रामस्थ व मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment