चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड शहराच्या बाजारपेठेमध्ये न्यू मांगले ज्वेलर्सच्या वतीने आज हिऱ्यांच्या दागिन्यांची भव्य प्रदर्शन व विक्री याचा शुभारंभ फीत कापून आज चंदगडच्या नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. न्यू मांगले ज्वेलर्सचे संचालक नामदेवराव मांगले यांनी सर्वांचे स्वागत केले. .
चंदगड शहरांमध्ये हे नवीन दालन सुरू झाल्याने चंदगडकरांसाठी एक वेगळी संधी निर्माण झाली आहे. सोन्याबरोबरच हिऱ्यांचेही दागिने चंदगड शहरामध्ये खरेदी करायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन सोमवार (१५) मंगळवार (१६) व बुधवार (१७) या तीन दिवसांमध्ये होणार आहे. त्यानंतरही ग्राहकांना हिऱ्यांचे दागिने खरेदी करायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचा ग्राहकांनी लाभा घ्यावा असे आवाहन संचालक श्री. मांगले यांनी केले आहे.
यावेळी पत्रकार सुनिल कोंडुसकर यांनी `दागिन्यांचा इतिहास हा रंजक व रोचक आहे. सौदर्य खुलविण्याचे काम दागिने करतात. दागिना म्हणजे सोनं. सोन्याला पर्याय म्हणून हिरा. चंदगडमधील लोकांची आपल्याकडे हिरा असावी अशी अपेक्षा असून मांगले यांनी ती पुर्ण केली आहे. मांगले या नावातच उदारत्व आहे. तुम्ही मागा मी देतो. म्हणजे तुम्ही हवा तो दागिना मागा. तो मी विक्रीसाठी उपलब्ध करतो.
यावेळी या कार्यक्रमाला चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद काणेकर, संचालक सुनील कानेकर, सचिन बल्लाळ, नेसरीचे संगापाना साखरे, रामा बागडी, सुरेश सातवणेकर, भास्कर कामत, मुरलीधर बल्लाळ, बाबुराव हळदणकर, मनोहर गडकरी, विनायक काणेकर, मिलिंद सामंत, विठ्ठल गावडे, भेरू गायकवाड, शौकत मदार, नूर मदार या मान्यवरांसह अनिता मांगले, शशिकांत मांगले, शितल मांगले, प्रियांका मांगले, आनंद गावडे हे घरचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष पाडले, शाहिद मदार, आनंद गावडे, निलेश आदारी, अमोल नेसरकर, अवधूत गवळी, आदिनाथ म्हाडगुत, संतोष ओऊळकर, सपना वाडकर, आशा पाटील, सोनाली लोहार, नम्रता लोहार या शोरुममधील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment